धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

धाराशिव : बोंबल्या मारुच्या पाठीमागे, उस्मानाबाद येथील- सुरेश छगन काळे यांनी पोलीसात तक्रार दिल्याचे कारणावरून दि.06.06.2023 रोजी 20.00 वा.सु. लक्ष्मी मंदीरासमोर बोंबले हनुमान चौक उस्मानाबाद येथे गावकरी- अंगद आश्रुबा सातपुते यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, चाकुने उजव्या दंडावर मारहान केली. तसेच त्यांच्या बचावास आलेल्या त्यांचा भाउ संतोष यांना शिवीगाळ करुन चाकुने डोक्यात मारु गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अंगद सातपुते यांनी दि. 07.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम-  326, 323, 504, 506, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : डोंगरे निवास, दाळींब येथील- संतोष बाळकृष्ण निकम, वय 43 वर्षे, यांच्या कंपनीचे काम बंद पाडण्याचे उद्देशाने आनंद सतिशराव पाटील, लखन गायाकवाड अन्य 14 यांनी  दि.03.06.2023 रोजी 11.22 ते 06.06.2023 रोजी 18.00 वा. सु. कोराळ शिवारात संतोष यांना शिवीगाळ करून सॅनवन कंपनीचे कार्यालयात प्रवेश करुन तोडफोड केली. तेथील कामगार यांना शिवीगाळ करुन मारहान केली. कंपनीचे साईट इन्चार्ज अरजित बासु व त्यांचे गाडीचा चालक यांना जबरदस्तीने गाडीत घेवुन त्यानांही शिवीगाळ करुन मारहान केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली.  अशा मजकुराच्या संतोष निकम यांनी दि. 07.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम-  452, 365, 323, 427,143, 147, 149, 504, 506, 507 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web