धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
कळंब : कळंब येथील- संदिप ठोंबरे, पप्पु ठोंबरे, रोहीत कसबा अन्य 4 यांनी जुन्या वादाचे कारणावरून दि.21.03.2023 रोजी 23.30 वा.सु. हॉटेल भेजराज समोर परळी रोड कळंब येथे फोन करुन बोलावून घेवून गावकरी- विजय विठ्ठल सावंत यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी कत्तीने, लोखंडी रॉडने डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या विजय सावंत यांनी दि.22.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 507 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : येरमाळा, ता. कळंब येथील- संदिप पवार, शरद बारकुल, सचिन बारकुल, तानाजी बारकुल, संजय बारकुल, निलेश बारकुल या सर्वांनी गाडीला ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून दि.21.03.2023 रोजी 19.00 ते 22.30 वा.सु. येरमाळा ब्रिज व साठेनगर येथे गावकरी- सागर सोमनाथ कसबे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तलवार, दगडाने, लोखंडी रॉडने सागर यांचे गाडीवर मारुन गाडीचे नुकसान केले. तसेच सागर यांचे रोख रक्कम व 2 सुवर्ण अंगठ्या असा एकुण- 44,500 ₹ चा माल चोरून नेला. घरात घुसून सामानाची नासधुस करुन सागर यांची मावशी मालन शिंदे यांना घक्काबुक्की केली. अशा मजकुराच्या सागर कसबे यांनी दि.22.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 379, 341, 427, 323, 143, 147, 148, 149, 336, 504, 506, 294 सह अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3 (1) (r) (s) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.