वाशी तालुक्यात दोन चुलत भावात तुफान हाणामारी 

एकाचे वडील भांडण सोडवण्यास गेले असता दुसऱ्याने पोटात चाकू खुपसून केला खून 

 
crime

वाशी  : मांडवा, ता. वाशी  येथील- हनुमंत दिगंबर देशमुख यांनी दि. 14.05.2023 रोजी 13.40 वा. सु मांडवा शिवारात शेत गट नं 60 मध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरुन  गावकरी- रविकांत बबन देशमुख  यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहान करत असताना रविकांत यांचे वडील बबन नारायण देशमुख, वय 65 वर्षे हे रविकांत यांचे बाचावास आले असता हनुमंत यांने  बबन यांच्या पोटात चाकू खुपसुन जिवे ठार मारले. 

अशा मजकुराच्या रविकांत बबन देशमुख यांनी दि.15.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302,504,506  सह शस्त्र कायदा कलम 3, 25अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जुन्या वादाचे कारणावरुन हाणामारी 
 

उमरगा  : लाडवंतीवाडी, ता. बस्वकल्याण येथील- भुजंग जमादार, देवराज पाटील, युवराज पाटील, शिवराज पाटील अन्य 2 या सर्वांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि.11.05.2023 रोजी 20.00 ते 20.30 वा. दरम्यान तलमोड शिवारातील पेट्रोलपंपाजवळ गावकरी – लक्ष्मण कमलाकर जमादार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी,हंटर, चाकू, दगडाने  मारहान करुन गंभीर जखमी केले. लक्ष्मण यांचे इचारीच्या खिशातील मोबाईल फोन काडून घेतला. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या लक्ष्मण जमादार यांनी दि.15.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148,149, 326, 327, 365, 324,323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web