उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

परंडा : देवळाली, ता. भुम येथील शिवकुमार व विजयकुमार चंद्रसेन शेटे या दोघा भावांचा शेत विहिरीच्या हिस्यावरुन जुना वाद आहे. शिवकुमार शेटे त्यांचा मुलगा- सर्वेश याहस दि. 18.11.2021 रोजी 11.00 वा.सु. देवळाली येथील त्यांच्या शेत विहिरीवर विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता भाऊ- विजयकुमार शेटे यांनी तेथे जाउन नमूद पिता- पुत्रांस शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच विहिरीवरील स्टार्टर बॉक्स आपटुन नुकसान करुन धमकावले. अशा मजकुराच्या शिवकुमार शेटे यांनी दि. 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 447, 323, 427, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा  : कोळसुर (गुं.), ता. उमरगा येथील वाल्मिक पासमे, अनिल पासमे, अजय पासमे, लक्ष्मण तेलंग या चौघांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 19.11.2021 रोजी 19.30 वा. सु. ग्रामस्थ- नवनाथ गुरव यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. यावेळी नवनाथ यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या आई- रंजनाबाई यांसही नमूद चौघांनी धक्काबुक्की करुन मुका मार दिला व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नवनाथ गुरव यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरी

तामलवाडी  : दहिफळ, ता. कळंब येथील अजित शहाजी भातलवंडे यांनी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल  क्र. एम.एच. 25 एएन 1361 ही दि. 17.11.2021 रोजी 09.00 ते 10.00 वा. दरम्यान गावातील पांगरधरवाडी- सांगवी रस्त्याकडेला लावली असता अज्ञात व्यक्तीने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अजित भातलवंडे यांनी दि. 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web