उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघात, एक ठार, पाच जखमी 

 
Osmanabad police

तामलवाडी : चालक- विठ्ठल हुकीरे, रा. उपळा, ता. उस्मानाबाद यांनी दि. 03 सप्टेंबर रोजी सुरतगाव शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर कार क्र. एम.एच. 13 एझेड 7033 ही निष्काळजीपने चालवून रस्त्याकडेने पायी जाणाऱ्या 40 वर्षीय एका अनोळखी पुरुषास पाठीमागुन धडक दिल्याने तो गंभीर जखमी होउन मयत झाला. अशा मजकुराच्या तामलवाडी पो.ठा. येथील पोहेकॉ- गोरोबा गाढवे यांनी अनैसर्गीक मृत्युच्या चौकशीत दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : अज्ञात चालकाने दि. 18 सप्टेंबर रोजी स्कार्पिओ वाहन क्र. जी.जे. 18 बीए 1580 हे इंदापुर ते वाशी रस्त्यावर निष्काळजीपने, भरधावर वेगात चालवून समोरुन येणाऱ्या स्विफ्ट कार क्र. एम.एच. 13 डीएम 4869 ला धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारमधील चालक- आकाश सुरेश जगताप यांसह त्यांची बहिन- अभिलाषा डमरे, भाऊजी- दिनेश डमरे व भाचा- ओम हे सर्वजण किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या आकाश जगताप यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


सार्वजनिक रस्त्यावर रहदारिस धोकादायरित्या वाहन- हातगाडा उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

लोहारा : अजीम रफिक बागवान, रा. लोहारा यांनी 18 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. लोहारा येथील सार्वजनिक रस्त्यावर फळगाडा रहदारीस धोकादायपने उभा करुन तर चिदानंद शरनाप्पा माळी, रा. सास्तुर, ता. लोहारा यांनी सास्तुर येथील चौकात ॲपेरिक्षा क्र. एम.एच. 25 एन 0225 हा रहदारीस धोकादायकपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web