उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघात 

 
Osmanabad police

तामलवाडी -  चालक- अक्षय तानाजी तौर, रा. आळणी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 12.12.2021 रोजी 05.45 वा. सु. कदमवाडी शिवारातील रस्त्यावर ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएस 7036 हा निष्काळजीपने चालवल्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सीए 0193 ला समोरुन धडकला. या अपघातात मो.सा. चालक- दिलीप हरीदार जाधव, रा. कुंभारी, ता. तुळजापूर यांसह मो.सा. वर पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी- सुनंदा या गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या सुनंदा जाधव यांनी दि. 25 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : आळणी, ता. उस्मानाबाद येथील पांडुरंग रामभाउ कुदळे, वय 64 वर्षे हे दि. 21.12.2021 रोजी 18.00 वा. सु. गुरे घेउन आळणी फाटा येथील रस्ता ओलांडत होते. यावेळी काजळा, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- गणेश गोवर्धन लिंगे यांनी बोलेरो वाहन क्र. एम.एच. 25 आर 6058 निष्काळजीपने चालवल्याने पांडुरंग कुदळे यांसह त्यांच्या गुरांना धडकले. या अपघातात पांडुरंग कुदळे यांसह दोन गायी जखमी झाल्या. अशा मजकुराच्या विठ्ठल पांडुरंग कुदळे यांनी दि. 25 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 429 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web