ऑनलाईन टास्कमुळे तुळजापूरच्या तरुणाची ११ लाखाची फसवणूक 

 
crime

धाराशिव  : माउलीनगर, तुळजापूर जि. उस्मानाबाद येथील- शिशिर शहाजीराव खोपडे, वय 33 वर्षे,  यांचे भ्रमणध्वनीवर आरोपीचा भ्रमणध्वनीवर क्र 8348720514 वरुन ऑनलाईन जॉब करण्याकरीता इच्छुक आहात का असाल तर एक ऑनलाईन टास्कचे हिशोबाचे पैसे देणार असे सांगितले. 

 त्यांनतर शिशिर खोपडे यांना ॲमेझॉन कंपनीचे वेबसाईट वरील ठराविक वस्तु ॲमॅझॉन कार्डमध्ये दाखल करुन ठराविक रक्कम फिर्यादीला भेटली. त्यानंतर टीआरओएन 89 डॉट कॉम या लिकंवर स्पे नावाच्या टेलीग्राम आयडीवरुन 11,41,000 ₹ गुंतविण्यास सांगून ते परत न करता त्यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या शिशिर खोपडे यांनी दि. 17.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे भा.दं. वि.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

विषारी औषध खाऊन कोंबड्या मृत्युमुखी 

लोहारा  : फिर्यादी नामे- तुकाराम सोपान शिंदे, वय 74 वर्षे, रा. लोहारा, ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांचे बेलवाडी शिवारातील शेतातील पाळलेल्या गावरान 30 कोंबंड्यांना आरोपी   ज्ञानेश्वर रामकृष्ण शिंदे, रा. बेलवाडी, ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांनी काहीतरी विषारी औषध खाण्यासाठी टाकल्याने ते खावुन 30 कोंबड्या मरण पावल्या असुन यात तुकाराम शिंदे यांचे  अंदाजे 18,000₹ चे नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या तुकाराम शिंदे यांनी दि. 17.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे भा.दं. वि.सं. कलम- 429, 427  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.                            

                                               

From around the web