तुळजापूर  :  मुलीला जाळून मारणाऱ्या आई, बहिण व भावजयीला जन्मठेप

रॉकेल ओतून जाळल्याची अतिशय क्रूर निर्दयी घटना  
 
court

उस्मानाबाद - पैसे देण्याच्या कारणावरून व तू येथे कशाला राहतेस ? असे म्हणून आई, बहिण व भावजय यांनी पोटच्या मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन तिला जाळले. याप्रकरणी निर्दयी आई, बहिण व भावजयीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथील ममता नाना पवार यांना आई सुलाबाई हनुमंत काळे (६० वर्ष) वैशाली ज्ञानेश्वर काळे भावजई (३० वर्ष) रा. नरखेड ता. मोहोळ जि. सोलापूर हल्ली मुक्काम ढेकरी व बहीण महादेवी नंदू शिंदे रा ढेकरी (२६ वर्ष) यांनी संगणमत करून ममता हीच पैसे देण्याच्या कारणावरून तिला नेहमी भांडण, तक्रारी करीत होते. तू इथे कशाला राहतेस ? असे म्हणून सतत त्रास दिला जात होता दि. २४ मे २०१६ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास तिची आई सुलाबाई, भावजय वैशाली व बहिण महादेवी नंदू शिंदे यांनी घरामधील रॉकेल फिर्यादीच्या मताच्या अंगावर ओतले. त्यामुळे ममता पळत घराबाहेर रस्त्यावर मंदिराकडे गेली. त्यावेळी तिच्या अंगावर भावजयने हाताच्या अंतरावरून काडी फेकल्याने ममता जळाली. ममता मोठ-मोठ्याने वाचवा वाचवा असे मोठमोठ्याने ओरडत मंदिराकडे गेली असता मंदिरात भजनासाठी आलेल्या लोकांनी तिच्या अंगावर वाकळ टाकून ती आग विझविली. 

तिच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरु  असताना तिचा दि.२७ मे २०१६ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. उपचारादरम्यान मृत्यूपूर्वी तिने दिलेल्या जबाबावरून आई, बहिण व भावजय यांच्या विरोधात तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आर.ए. भंडारी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात मृत्यूपूर्व जबाबावरुन या प्रकरणात कलम ३०२ वाढविण्यात आले होते. या प्रकरणात साक्षीदार कार्यकारी दंडाधिकारी डॉक्टर यांचा पुरावा व मृत्युपूर्व जबाब आला दुजोरा देणारा ठरला त्यामुळे मतही पारधी समाजाची असून ती ९५ टक्के भाजली होती. 

त्यामुळे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे विचारात घेऊन जळीत महिलेचे मृत्युपूर्व जबाब विचारात घेऊन व सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आई, बहिण व भावजय या तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पंडित के. जाधव यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी ही कार वाघमारे यांनी सहकार्य केले.

From around the web