तुळजापूर  :  ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून साडेचार लाखाची फसवणूक 

 
crime

तुळजापूर : देवसिंगा तुळ, ता. तुळजापूर येथील- राजकुमार जनार्धन जाधव यांनी ऊसतोड मजूर पुरवण्याचा करार दि. 31.05.2013 रोजी 12.30 वा. सु.  विश्वनाथ कॉर्नर जवळील हॉटेल मध्ये तुळजापूर येथे लोभा तांडा, ता मुखेड येथील- विनोद गोपीनाथ चव्हाण यांच्याशी केला होता. त्यापोटी राजकुमार यांच्याकडून रोख स्वरुपात एकुण 4,50,000 ₹ रक्कम दि. 31.08.2023 रोजी पावेतो घेवून राजकुमार यांना पैसाचे बदल्यात ऊसतोड मजूर न पुरवीता व घेतलेली नमूद रक्कमही परत न करता राजकुमार यांची आर्थिक फसवणकू केली. अशा मजकुराच्या राजकुमार जाधव यांनी दि. 02.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406,  420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

उमरगा  : एकोंडी (जहागिर), ता. उमरगा येथील-नितीन सुभाष रावळगुंड हे दि. 02.06.2023 रोजी 19.45 वा. सु. आपआपल्या ताब्यातील ॲपे सिटी  क्र. एम.एच. 25 एम 1677 हा उमरगा शहरातील बसस्थानक समोरील मेन रोडचे मध्यभागी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 गावशिवाराच्या आवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

ढोकी  :दाउतपुर, ता. उस्मानाबाद येथील- राजाभाउ विठ्ठल भालेराव  हे दि.01.06.2023 रोजी 19.30 वा सुमारास दाउतपूर  येथे परिसरात मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना ढोकी पो. ठा. च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1)  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web