तुळजापूर : मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

 
crime

तुळजापूर  : आरोपी नामे-1) दशरथ बळीराम कांबळे, वय 26 वर्षे, रा. चिंचोली, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांनी दि. 17.08.2023 रोजी 01.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 13 एपी 9156 ही सावरकर चौक तुळजापूर येथे  रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 (1) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तुळजापूर पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : आरोपी नामे-1) रमेश सुरेश ढवळे, वय 27 वर्षे, कसबे तडवळा, ता. जि. उस्मानाबाद यांनी दि. 16.08.2023 रोजी 22.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एआर 3925 ही  पेट्रोलपंप ढोकी  येथे  रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 (1) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द ढोकी  पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.


रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 उमरगा  : आरोपी नामे-1) मिलींद विठ्ठल म्हैसे,रा. बगदरी, ता. बसवकल्याण जि. बिदर यांनी दि. 17.08.2023 रोजी 12.15 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र केए 56 - 4661 हा  उमरगा येथे आरोग्य कॉर्नर रोडवर मध्यभागी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. तर आरोपी नामे- 2) संतोष्ज्ञ शंकरराव माळी, वय 44 वर्षे रा. तुरोरी ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 17.15 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र केए 56 - 4661 हा  उमरगा येथे आरोग्य कॉर्नर रोडवर मध्यभागी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. तर आरोपी नामे 3) शाहुराज वसंत मुगळे, वय 35 वर्षे रा. नारंगवाडी ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 17.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र केए 56 - 4661 हा  उमरगा येथे आरोग्य कॉर्नर रोडवर मध्यभागी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

गावशिवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

शिराढोण  : आरोपी नामे- 1)निलेश पंडीत काळे, वय 37 वर्षे, रा. नागुलगाव, ता. कळंब जि. उस्मानाबाद हे दि.16.08.2023 रोजी 22.30 वा सुमारास पो स्टे शिराढोण चे समोर सार्वजनिक ठिकाणी रोडवर मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना शिराढोण पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) सह मपोका 110/117 अन्वये पो.ठाणे शिराढोण येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web