तुळजापूर : व्हाट्सॲप गटात महिलेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

तुळजापूर  : तुळजापूर तालूक्यातील एका व्यक्तीने गावातीलच एका महिलेचा नामोल्लेख करुन ही महिला फक्त 500 ₹ मध्ये धंदा करत असून तीचा प्रियकर तिला ग्राहक शोधून देत आहे. असा बदनामी कारक मजकुर असलेला संदेश गावातील 3 व्हाट्सॲप गटात दि. 16.11.2021 रोजी प्रसारीत केला. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेच्या पतीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 500, 501 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

परंडा : दुधी ग्रामस्थ- सुमित कोल्हे हे दि. 16.11.2021 रोजी 22.30 वा. आपल्या आईसोबत भांडत होते. हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न ग्रामस्थ- मनोहर जाधव यांनी केला असता सुमित याने त्यांना शिवीगाळ करुन ढकलून जमिनीवर पाडले आणि त्यांच्या डोक्यात दगड मारुन व गालाचा चावा घेउन त्यांना जखमी केले. यानंतर सुमितने जाधव यांच्या घरात घुसून त्यांचा दुरदर्शन संच जमिनीवर आदळून फोडला. अशा मजकुराच्या मनोहर जाधव यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 452, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : फुलवाडी टोलनाक्यावर दि. 16.11.2021 रोजी रात्री 11.00 वा. राजेंद्र वर्मा हे टोल वसुली करत होते. यावेळी नळदुर्ग येथील अमर डुकरे, ज्ञानेश्वर कदम, आकाश डुकरे यांसह त्यांच्या अन्य तीघां मित्रांनी टोलनाका अडवून धरल्याने वर्मा यांनी त्यांनी वाहन बाजुला घेण्यास सांगीतले यावर नमूद 6 लोकांनी गोंधळ घालून नाका कर्मचारी- अजय शिंदे, विजय डोंगरे यांना टोलनाक्यात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहान करुन शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या राजेंद्र वर्मा यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 452, 143, 147, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                           

From around the web