ट्र्क मालक ठरला स्वतःच्या ट्र्र्क चोरीचा आरोपी 

परंडा तहसील कार्यालय आवारातील चोरीस गेलेल्या ट्रकसह आरोपी दुसऱ्या दिवशी अटकेत
 
s

परंडा  : आंदोरी, ता. परंडा येथील आश्रु राजेंद्र बारस्कर यांचा ट्रक क्र. एम.एच. 12 एफझेड 3450 हा खासगांव येथील नदी पात्रातून 3 ब्रास वाळू  अवैध वाळू वाहतूक करत असतांना दि. 02.02.2018 रोजी महसूल विभागाने जप्त करुन परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात लावला होता. तो ट्रक दि. 27 सप्टेंबर च्या पहाटे अज्ञाताने चोरुन नेला होता. याप्रकरणी खासापुरीचे कोतवाल- सतीष कांबळे यांच्या प्रथम खबरेवरुन परंडा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 नुसार गुन्हा नोंद क्र. 324 / 2021 दाखल करण्यात आला.

            परंडा पो.ठा. च्या पोनि-  सुनिल गीड्डे यांसह , सपोनि- श्री. हींगे, पोहेकॉ- दिलीप पवार, पोना- किरण हावळे, पोकॉ- अजीत कवडे, यादव यांच्या पथकाने गोपनीय माहिती घेतली असता त्या ट्रकचे मालक आश्रु बारस्कर यांचा या चोरीमागे हात असावा. असा पोलीसांचा संशय बळावल्याने पथकाने त्यास आज दि. 28 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. नमूद ट्रक विषयी विचारले असता सुरुवातीला त्याने साळसुदपनाचा आव आणण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलीसांच्या भडीमारासमोर तो जास्त काळ टिकाव धरू शकला नाही. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नमूद ट्रक पोलीसांनी जप्त केला असून उर्वरीत तपास सुरू आहे. 

चोरीचे अन्य दोन गुन्हे दाखल 

शिराढोण  : कमलबाई आबा वाघे, रा. खामसवाडी, ता. कळंब यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 22- 26 सप्टेंबर दरम्यान तोडून घरातील पेटीत असलेले 20 ग्रॅम सुवर्ण दागिने व 80,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या कमलबाई वाघे यांनी दि. 27 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा समुद्रवाणीचे कुलूप, खिडकीचे गज, सीसीटीव्ही व आणीबाणीचा गजर यांचे वायर तीन अनोळखी पुरुषांनी दि. 27 सप्टेंबर रोजी 01.44 ते 04.41 वा. दरम्यान तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या बँक व्यवस्थापक- कुंदन पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380, 511, 427, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web