तुळजापुरात ट्रकची  पोलीस चौकीस धडक 

 
Osmanabad police

तुळजापूर : चालक- सुरज त्रिंबक धडे, रा. सोलापूर यांनी दि. 01.12.2021 रोजी 21.30 वा. सु. छ. शिवाजी महाराज चौक, तुळजापूर येथील रस्त्यावर ट्रक क्र. एम.एच. 13 आर 4740 हा निष्काळजीपने चालवून रस्त्याबाजूस असलेल्या फायबरच्या पोलीस चौकीस धडक देउन आर्थिक नुकसान केले. यावरुन तुळजापूर पो.ठा. चे विजयकुमार राठोड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 427 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरीत्या वाहन उभा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

तामलवाडी : अमर मल्लीनाथ स्वन्नेर, रा. सोलापूर यांनी दि. 02.12.2021 रोजी 16.00 वा. सु. तामलवाडी येथील कटारे गिरणीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 13 सीटी 6974 हा रहदारीस धोकादायपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीचे दोन गुन्हे 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील पृथ्वीराज भाऊराव मस्के व यशराज हे दोघे बंधू दि. 30.11.2021 रोजी 12.30 वा. सु. श्रीपतराव भोसले हासस्कुल, उस्मानाबाद येथे मोटारसायकलने गेले होते. यावेळी हायस्कुल शिक्षक- राजाभाऊ पांडुरंग पवार यांनी त्या दोघांना त्यांची मो.सा. गेटच्या बाहेर लावण्यास सांगीतले असता त्या दोघांनी पवार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. तसेच पवार यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून, “तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो.” असे धमकावले. अशा मजकुराच्या राजाभाऊ पवार यांनी दि. 02 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 327, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : कोंड, ता. उस्मानाबाद येथील नवनाथ शिंदे व त्यांची पत्नी- श्रीदेवी यांनी मजुरीचे पैसे दि. 01.12.2021 रोजी 21.00 वा. सु. गावकरी- रहिम दस्तगीर मुलानी यांना त्यांच्या घरासमोर मागीतले. यावर रहिम यांसह त्यांच्या कुटूंबातील- तब्बसुम, शहिदा, राबनबी व गल्लीतील खंडू गवळी या सर्वांनी घरासमोर येउन पैसे मागीतल्याच्या कारणावरुन नमूद शिंदे पती- पत्नीस जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या श्रीदेवी शिंदे यांनी दि. 02 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143, 147, 149, 504 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web