अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लग्न लावून अत्याचार

 
Osmanabad police

उस्मानाबाद - नात्यातील महिला व पुरुषाने एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस नवीन कपडे घेण्याचे अमिष दाखवून शेजारील गावी नेऊन ती अल्पवयीन असताना देखील तिचा त्या गावातीलच एका तरुणाशी विवाह लावून दिला. यानंतर त्या तरुणाने त्या अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुध्द तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नव्हे तर घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास त्या तरुणाच्या कुटूंबियांनी तिला ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील एका गावातील एका १३ वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) दि. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास गावातील व नात्यातीलच दोघा स्त्री- पुरुषांनी त्या मुलीस नवीन कपडे घेण्याचे अमिष दाखवून शेजारील गावी नेऊन ती अल्पवयीन असताना तिचा त्या गावातील एका तरुणाशी विवाह लावून दिला. 

यानंतर त्या तरुणाने त्या मुलीच्या इच्छेविरुध्द तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास त्या तरुणाच्या कुटूंबियांनी तिला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संबंधित मुलीच्या तक्रारीवरून भादंसं कलम ३७६, ३६६, ३२३, ५०६, ३४ सह बाल विवाह अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम ९, १०, ११ सह पोक्सो कायदा कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web