उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

मारहाणीचे दोन गुन्हे दाखल 
 
Osmanabad police

कळंब  : ईटकुरचे तलाठी प्रविण पालके हे दिनांक 27.12.2021 रोजी 11.30 वा गावातील वासेरा नदी काठावर गेले असता गावकरी सिध्देश्वर व जयदेव गंभीरे हे दोघे भाउ ट्रॅक्टर –ट्रेलर मधुन सुमारे दिड ब्रास वाळु चोरुन नेत असल्याचे दिसले. यावर पालके यांनी त्या दोघांना अडवुन कायदेशीर कारवाई कामी कळंब तहसील कार्यालयात सोबत चलण्यास सांगितले असता ते दोघे पालके यांना धमकी देवुन ट्रॅक्टर-ट्रेलर घेवुन नदीच्या पाण्यातुन पलीकडे पसार झाले.अशा मजकुराच्या प्रविण पालके-तलाठी यांनी दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379,506,34 सह गौण खनीज कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : हाडोंग्री येथील जिओ दुरसंचार मनो-याचे 50 मी. विदयुत वायर दिनांक 18.12.2021 रोजी रात्री 02.00 वा अज्ञात चोरटयाने चोरुन नेले.अशा मजकुराच्या  सुरक्षा रक्षक वैभव सुरवसे यानी  दि. 01.01.2022  रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी :  सावरगाव येथील राजाराम माने यांच्या शेतातील फवारणी  पम्प व विहीरीतील पानबुडी विदयुत पम्प तसेच शेजारच्या रेवणसिध्द येडाप्पा यांच्या  विहीरीतील पानबुडी विदयुत पम्प दि. 23-24.12.2021  दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले अशा मजकुराच्या राजाराम माने यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीचे दोन गुन्हे दाखल 

उस्मानाबाद - ग्रामीण पोलीस ठाणे : बार्शी येथील जयसींह मोरे हे दिनांक 30.12.2021 रोजी 17.00 वा येडशी येथील उडडान पुलाजवळ थांबलेले होते. यावेळी कार क्रमांक एम एच 13 एम आर 3147 मधील चालकासह तीन  पुरुषांनी त्यांना अपसिंगा गावाचा रस्ता विचारला असता मोरे यांनी त्यांना उस्मानाबादला जाण्यास सांगितले. यावर ते कार घेवुन थोडे पुढे गेले आणी पुन्हा मागे परतले.  तु आम्हाला चुकीचा रस्ता सांगितला असा वाद त्यांनी मोरे यांचेशी घालुन मोरे यांना चेह-यावर बुक्यांनी मारहाण करुन निघुन गेले .अशा मजकुराच्या मोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325,34 कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : गोलेगाव ग्रामस्थ आविनाश तांबे हे दिनांक 30.12.2021 रोजी 18.30 वा गावात उभे होते.यावेळी नवलगाव ग्रामस्थ गणेश भगत यांनी जुन्या वादातुन धमक्या देवुन दगड तांबे यांचेवर फेकुन मारल्याने त्यांच्या डोक्यास जखम झाली. अशा मजकुराच्या तांबे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 506, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web