उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

उमरगा तालुक्यात दोन ठिकाणी हाणामारी 
 
Osmanabad police

उस्मानाबाद : गांधीनगर, उस्मानाबाद येथील विनोद नानासाहेब माळी यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 14.11.2021 रोजी 02.00 वा. सु. उचकटून घरातील कपाटात ठेवलेले 16,500 ₹ किंमतीचे सोने- चांदीचे दागिने व 6,800 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या विनोद माळी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : पळसप, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- हनुमंत कल्याण गाडे यांच्या बुक्कनवाडी शिवारातील गट क्र. 158 मधील शेत गोठ्यातील एक म्हैस दि. 12.11.2021 रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या हनुमंत गाडे यांनी दि. 14.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : तांबरी विभाग, उस्मानाबाद येथील मिना तिर्थकर यांच्या नातेवाईकांची बजाज पल्सर मोटारसायकल क्र. एम.एच. 12 एचपी 1499 ही दि. 01.11.2021 रोजी रात्री तिर्थकर यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या मिना तिर्थकर यांनी दि. 14 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील एक 16 वर्षीय मुलगी दि. 07.06.2021 रोजी दुपारी 14.00 वा. आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाली. यावरुन कोण्या अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या मुलीच्या आईने दि. 14.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

मुरुम  : आलुर, ता. उमरगा येथील चाँदपाशा इसाक लोहारे यांसह त्यांच्या कुटूंबातील असिफ, कलीम, अरबाज, गुडूसाब, मैनुद्दीन, जरीना, शफीक, खैरुनबी तसेच बाई पाठाण यांच्या गटाचा ग्रामस्थ- पुतळकर मल्लीनाथ रामशेट्टी यांसह त्यांच्या कुटूंबातील गणेश, सचिन, सायब्बाना, महेश, श्रीशैल तसेच जमीलमिया पिरजादे, खुजादमिया पिरजादे, एजाजमिया पिरजादे, संतोष मरबे व अन्य 6 व्यक्ती यांच्या गटाशी शेतातील पिक मळणीच्या कारणावरुन दि. 14.11.2021 रोजी 14.30 वा. सु. आलुर शिवारात हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन व लाथाबुक्क्यांनी, दगड, नळी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या चाँदपाशा लोहारे व पुतळकर रामशेट्टी यांनी परस्परविरोधी दिलेल्या प्रथमखबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.

उमरगा : मोटारसायकलने हुलकावनी दिल्याच्या वादातून उमरगा येथील धिरज देशमुख, स्वप्नील देशमुख, सुरज देशमुख या तीघांनी दि. 13.11.2021 रोजी 20.30 वा. सु. गुंजोटी येथील रस्त्यावर गुंजोटी ग्रामस्थ- मोहम्मद मुजावर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने नाकावर, छातीवर मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मोहम्मद मुजावर यांनी दि. 14 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                   

From around the web