उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल
शिराढोण : पिंप्री (शि.) ता. कळंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कार्यालयाचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 21- 22.09.2021 दरम्यान तोडून आतील बेस्टन कंपनीचा एलईडी टीव्ही चोरुन नेला. अशा मजकुराच्या जि.प. शाळा कर्मचारी- सुभाष शिंदे यांनी दि. 07 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : जगदीश देवेंद्र गुत्तेदार, रा. गोणी, ता. कमलापुर, राज्य- कर्नाटक यांनी त्यांचे क्रुझर वाहन क्र. के.ए. 16 बी 0206 ही तुळजापूर येथील मलबा हॉस्पीटल येथील एका पत्रा शेडजवळ लावले असता दि. 07 ऑक्टोबर रोजी पहाटे 03.00 वा. सु. अज्ञाताने चोरुन नेले. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : भारत कोंडीबा माळी, रा. गौर, ता. कळंब यांनी त्यांची हिरो डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 7957 ही दि. 06 ऑक्टोबर रोजी 01.00 ते 01.30 दरम्यान तहसील कार्यालय, कळंब च्या आवारात लावली असता अज्ञाताने ती चोरून नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
नळदुर्ग: करडेवाडी, ता. विजापूर येथील सर्जा अप्पु डोंबाळे व रावबा अप्पु डोंबाळे या दोघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 05 ऑक्टोबर रोजी 17.00 वा. सु. सराटी शिवारात खंडोबा करपे यांसह त्यांचा भाऊ- भिमाप्पा यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या खंडोबा करपे यांनी दि. 07 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.