येरमाळ्यात रात्रगस्ती दरम्यान तीन  संशयीत ताब्यात

 
Osmanabad police

येरमाळा  : येरमाळा पो.ठा. चे पथक दि. 18 ऑक्टोबर रोजी पहाटे 04.00 वा. सु. येरमाळा- येडशी महामार्गावर रात्रगस्तीस होते. यावेळी मलकापुर फाटा परिसरातील अंधारात असणाऱ्या तानाजी काळे, दिलीप पवार, रमेश पवार, जालिंदर काळे, सर्व रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा यांना पोलीसांनी हटकले. यावेळी त्यांच्याजवळ प्रत्येकी 1 कि.ग्रॅ. च्या 66 पिशव्या खाद्य तेल, तुर डाळीचे 30 कि.ग्रॅ. वजनाची 2 पोती आढळून आली. भल्या पहाटे अंधारात हा माल बाळगुन असल्याबद्दल नमूद तिघे समाधानकारक माहिती देउ न शकल्याने तो माल महामार्गावरील वाहनांच्या हौद्यातून चोरलेला असावा असा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेउन पोउपनि- श्री नजिनोद्दीन नाईकवाडी यांच्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 124 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चोरीच्या दोन घटना 

वाशी  : चंद्रकांत बाबासाहेब चौधरी, रा. तांदुळवाडी, ता. वाशी यांनी पैसेवारीने केलेल्या तांदुळवाडी गट क्र. 97 मधील शेतातील 35,000 ₹ किंमतीचा सोयाबीनचा ढिग दि. 17- 18 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या चौधरी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : श्रीशैल्य हिरेमठ, रा. गुलबर्गा, राज्य- कर्नाटक यांची तुळजापूर येथील कामत हॉटेल परिसरात लावलेली बजाज पल्सर मो.सा. क्र. के.ए. 32 ईयु 6895 ही दि. 14- 15 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या हिरेमठ यांनी दि. 18 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web