उमरग्यात वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टिप्परसह तिघे ताब्यात

 
Osmanabad police

उमरगा  : उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पथक दि. 24.12.2021 रोजी 03.00 वा. सु. रात्रगस्तीस होते. यावेळी जकेकुर चौरस्ता – लातुर रस्त्यावरील विरुदेव मंदीरासमोर टिप्पर क्र. एम.एच. 47 एएस 0608 मधून 5 ब्रास वाळू अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे आढळले. पथकाने टिप्परमधील चालक- अनिल चव्हाण यांसह प्रभात पाटील, सुदर्शन ढावळे तीघे रा. निलंगा यांना वाळुच्या मालकी, परवाना इत्यादी विषयी विचारले असता ते समाधानकारक माहिती देउ शकले नाही. यावरुन त्या टिप्पर मधून चोरीच्या वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने त्या तीघांसह वाळुने भरलेला ट्रक ताब्यात घेउन उमरगा पो.ठा. चे माधव बोईनवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरीच्या सुवर्ण दागिन्यासह महिला आरोपी अटकेत

उस्मानाबाद  : डिकसळ, ता. कळंब येथील श्रीमती- बेबीनंदा सगट यांच्या ताब्यात तुळजापूर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र. 37 / 2021 या भा.दं.सं. कलम- 379 नुसारच्या चोरीच्या गुन्ह्यातील 10 ग्रॅम सुवर्ण वडी असल्याच्या गोपनीय माहितीवरुन स्था.गु.शा. च्या सपोनि- शैलेश पवार, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, टेळे यांनी दि. 24.12.2021 रोजी ताब्यात घेउन नमूद सोने त्यांच्या ताब्यातून जप्त केले आहे.

From around the web