उमरग्यात कार जाळणाऱ्या तीन मराठा आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल 

 
s

 उमरगा -  मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे , या मागणीसाठी तालुक्यातील माडज येथील तरुणाने बुधवारी (ता. सहा) तलावात आत्महत्या केल्याच्या आरोप गावकऱ्यांनी केल्याच्या  घटनेनंतर गुरूवारी (ता. सात) सकाळी माडज गावातुन मयत किसन माने यांचा मृतदेह घेऊन घोषणाबाजी करत जमाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. उत्तरीय तपासणीनंतर जमाव उपविभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडकला. दरम्यान या वेळी शासकिय विश्रामगृहासमोर दोन तरुणांनी कार पेटवून देत मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी नामे- वैजिनाथ काळे, रा. माडज, 2) धिरज पाटील, रा जकेकुर, 3) बाबा पवार, रा येळी ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी पंचायत समिती कार्यालयासमोरील एनएच 65 रोडवर नुद आरोपीतांनी संगणमत करुन मयत नामे किसन चंद्रकांत माने, वय 30 वर्षे, रा माडज ता. उमरगा यांचे प्रेत दि.07.09.2023 रोजी 12.00 वा.सु. मयताचे नातेवाईक व जमलेल्या माडज गावातील मराठा समाजाच्या लोकांनी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उमरगा समोरील रोडवर आणून त्यांचे मागणी संदर्भाने उपविभागीय दंडाधिकारी यांना त्यांचे कार्यालयासमोर रोडवर निवेदन देत असताना यातील नमुद आरोपीतांनी त्यांचे ताब्यातील टाटा इंडिका कार क्र एमएच 12 सीडी 8058 ही पंचायत समिती उमरगा कार्यालयासमोरील एनएच 65 रोडवर उभी करुन सदर कारवर ज्वलनशिल द्रव्य टाकुन आग लावून  रोडवर योणारे जाणारे लोकांचे मानवी जिवन व स्वत:चे जिवन धोक्यात येईल त्यांना दुखापत अथवा नुकसानहोईल अशा रितीने अत्यंत बेदकारपणाचे व हयगईचे कृत्य करुन कारला आग लावून कारचे नुकसान केली. अशा मजकुराच्या पोलीस ठाणे उमरगाचे पोलीस अमंलदार 1746 रणजित रामचंद्र आडे यांनी दि.07.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 435, 285, 336, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web