उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात तीन ठार 

 
crime

उमरगा  : भिमनगर, उमरगा येथील- गौतम विठ्ठल सरपे, यांचा मुलगा रोहीत गौतम सरपे व त्याचे दोन मित्र आकाश रोहीदास मोरे, विठ्ठल कांबळे हे तिघे दि.03.02.2023 रोजी 21.00 वा. सु. लातुर येथुन उमरग्या कडे स्कुटर क्रं केए 32 यु 3425 वर बसून जात होते.

 दरम्यान कवठा शिवारातील मल्हार धाब्याजवळ दरम्यान जांबरुन, ता. लोहा येथील- माधव नारायण कोंडेवाड यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रक क्र एम.एच.26 बीई 7435 हा भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने रोहीत व आकाश यांना पाठीमागून धडक बसल्याने रोहीत व आकाश हे दोघे गंभीर जखमी होउन मयत झाले. तर विठ्ठल यांना किरकोळ व गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या मयताचे वडील-गौतम सरपे यांनी दि.06.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : शिंगोली, ता उस्मानाबाद येथील- सुमित ऊर्फ दादा शेषेराव वाघमारे, वय 22 वर्ष हे  दि.05.02.2023 रोजी 20.30 ते 20.45 वा. सु. तुळजापूर कडून काक्रंबा मार्ग भातांगळी येथे मोटरसायकल क्रं एम.एच 12 एसएन 8505 वर बसून जात होते. दरम्यान काक्रंबा येथील मस्जीद जवळ अज्ञात वाहन चालकाने त्यांच्या ताब्यातील ट्रक क्र एम.एच.26 बीई 9637 हा भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने सुमित यांना समोरून धडकल्याने सुमित हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे वडील-शेषेराव वाघमारे यांनी दि.06.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 परंडा  : समतानगर, परंडा  येथील- नियामत हन्नुरे यांनी दि.06.02.2023 रोजी 10.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र. एम.एच. 07 8551 हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकत सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना परंडा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत परंडा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल

तुळजापूर  : हागलुर, ता. तुळजापूर येथील- प्रशांत घुगे  यांनी दि. 06.02.2023 रोजी 12.30 वा. सु. आपल्या ताब्यातील क्रुझर जिप क्रं. एम.एच.25 आर. 8138 ही तुळजापूर येथे सावरकर  चौकात सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तुळजापूर पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                       

From around the web