उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार 

 
Osmanabad police

येरमाळा  : परतापुर, ता. कळंब येथील तुकाराम रामभाउ गायकवाड, वय 65 वर्षे हे दि. 22.10.2021 रोजी 17.45 वा. सु. परतापुर शिवारातील येरमाळा- कळंब रस्ता पायी ओलांडत असतांना निमी ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर जखमी उपचारकामी न नेता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता संबंधीत मिनी ट्रक चा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- शेषेराव गायकवाड यांनी दि. 30.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ), 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : चालक- सुर्यकांत रंगनाथ पंडीत, रा. सेलु, ता. वाशी यांनी दि. 22.10.2021 रोजी 09.40 वा. सु. भाटसांगवी येथील रस्त्यावर ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 23 एक्स 2138 हा निष्काळजीपने, भरधाव वेगात चालवल्याने पलटला. या अपघातात ऑटोरिक्षा मधील प्रवासी- लक्ष्मण विश्नाथ खराडे, वय 60 वर्षे, रा. सेलु हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या सेलु येथील अनिल गवारे यांनी अनैसर्गीक मृत्यु क्र. 44/21 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशीत दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ), 337, 338, 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : सांजा येथील मधुकर पंढरी साबळे, वय 55 वर्षे हे दि. 22.10.2021 रोजी 21.00 वा. सु. उस्मानाबाद येथील साई कलम हॉटेलसमोरील रस्ता पायी ओलांडत असतांना कार क्र. एम.एच. 12 एसएफ 8253 च्या धडकेत गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- बालाजी साबळे यांनी दि. 30.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ), 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web