उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात तीन जखमी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद : लातूर येथील इम्रान चाँदपाशा शेख, वय 28 वर्षे हे दि. 07.11.2021 रोजी 19.00 वा. सु. दर्गा गड, उस्मानाबाद येथील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 7287 ही निष्काळजीपने चालवून इम्रान शेख यांना पाठीमागून धडक दिल्याने त्यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या इम्रान शेख यांनी दि. 09 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद : धानोरा (देव), ता. कळंब येथील बालाजी तिडके हे दि. 09.12.2021 रोजी 15.15 वा. सु. उस्मानाबाद येथील रस्त्याने कार क्र. एम.एच. 12 क्युवाय 8154 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 2887 ही चुकीच्या दिशेने निष्काळजीपने चालवून तिडके यांच्या कारला उजव्या बाजूने समोरुन धडक दिली. या अपघातात बालाजी तिडके यांसह तो मो.सा. चालक स्वत: जखमी होउन कारचे नुकसान झाले. अशा मजकुराच्या तिडके यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 427 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
बेंबळी : लोहारा येथील महादेव बलभिम लादे हे दि. 14.10.2021 रोजी 03.30 वा. सु. तोरंबा गावातील रस्त्याने पायी जात असतांना मोटारसायकल क्र. एम.एच. 24 पी 1037 ने पाठीमागून दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचारास न नेता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता नमूद मो.सा. चा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या महादेव लादे यांनी दि. 09 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरी

उमरगा  : त्रिकोळी, ता. उमरगा येथील सुग्रीव निवृत्ती मुंगळे हे दि. 08.12.2021 रोजी 23.00 वा. सु. घर कुलूपबंद करुन त्यांच्या शेतात गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 08.00 वा. सु. ते घरी परतले असता घराचे कुलूप कोण्या अज्ञात व्यक्तीने तोडून कपाटातील 2,02,100 ₹ किंमतीचे सोने- चांदीचे दागिने व 15,000 ₹ रक्कम चोरीस गेल्याचे आढळले. अशा मजकुराच्या सुग्रीव मुंगळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
लैंगीक छळ

उस्मानाबाद  : उमरगा तालुक्यातील एका तरुणाने गावातीलच एका 14 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे आमिष दाखवून दि. 06- 08.12.2021 रोजी दरम्यान एका वाहनातून तीचे अपहरन करुन तीच्यावर वेळोवेळी लैंगीक अत्याचार केले. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या आईने दि. 09 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 363, 366 (अ), 341, 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 6, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web