उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना 

 
Osmanabad police

परंडा : सिकलकर गल्ली, परंडा येथील अतिक सिकलकर व जियान सिकलकर हे दोघे चुलत भाऊ दि. 17.01.2022 रोजी 09.00 वा. सु. परिसरातील- शेळके भुखंडावर पतंग उडवत होते. यावेळी तेथे पंतग उडवण्याच्या कारणावरुन ग्रामस्थ- साबेर सलीम चाउस यांनी नमूद दोघा भावांना शिवीगाळ करुन वायरने मारहान केली. यावर मुलांस मारहान केल्याचा जाब विचारण्यास जमीर शेकनुर सिकलकर हे गेले असता साबेर यांनी जमीर यांसही शिीवगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या जमीर सिकलकर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : देवळाली, ता. कळंब येथील बिक्कड कुटूंबातील श्रीकांत, बाबासाहेब, लता, कौशल्या, चंद्रकांत, श्रीकांत यांसह बाळासाहेब पाटील या सर्वांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 15.01.2022 रोजी 15.30 वा. सु. गावातील जागृती विद्यामंदीर येथे देवधानोरा, ता. कळंब येथील दयानंद सत्यनारायण बोंदर यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन दयानंद यांना जखमी केले. अशा मजकुराच्या दयानंद बोंदर यांनी दि. 17 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 141, 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत वाठवडा, ता. कळंब येथील व्यंजने कुटूंबातील आल्का, प्रल्हाद, आनिता, धीरज या चौघांनी भुखंड वाटणीच्या कारणावरुन दि. 10.01.2022 रोजी 09.30 वा. सु. नातेवाईक- महानंदा अंगद व्यंजने यांसह त्यांचे पती व मुलगा यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी कुऱ्हाड, दगड, काठीने मारहान करुन नमूद तीघांना जखमी केले. अशा मजकुराच्या महानंदा व्यंजने यांनी दि. 17 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघात 

तुळजापूर  : राळगा, ता. अहमदपुर, जि. लातुर येथील रमेश विठ्ठल आडे, वय 40 वर्षे हे दि. 14.01.2022 रोजी 15.00 वा. सु. भातंब्री शिवारातील रस्ता वळणावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 3759 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. एम.एच. 24 एबी 8699 हा निष्काळजीपने चालवल्याने रमेश आडे चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला समोरुन धडकला. या अपघातात आडे हे मयत झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेले भिमा प्रेमराज राठोड व जावीर, दोघे रा. वसंतनगर तांडा, ता. परळी, जि. बीड हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या भिमा राठोड यांनी दि. 17 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : येणेगुर, ता. उमरगा येथील मदार यासीन भालके हे दि. 07.01.2022 रोजी 10.30 वा. सु. नळवाडी शिवारातील शेतात कांद्याची पोती भरण्यासाठी ट्रक क्र. एम.एच. 11 एएल 1557 हा घेउन गेले होते. यावेळी ट्रक चालक- मनोज कुमार भिमाशंकर, रा. येणेगुर यांनी तो ट्रक निष्काळजीपने पाठीमागे चालवल्याने पाठीमागे उभे असलेल्या मदार भालके यांना त्या ट्रकचा धक्का लागून त्यांच्या बरगडीचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मदार भालके यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web