उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना
परंडा : टाकळी, ता. परंडा येथील शहाजी व तानाजी मारुती पवार या दोघा भावांत शेती वाटणीच्या कारणावरुन जुना वाद आहे. शहाजी पवार यांसह त्यांचा मुलगा- राहुल व तानाजी पवार हे तीघे नमूद प्रकरणासाठी दि. 15.11.2021 रोजी 15.00 वा. सु. परंडा येथे आले असता त्यांच्यात वाद होउन शहाजी पवार व त्यांच्या मुलाने तानाजी पवार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन करुन जखमी केले. यावेळी तानाजी यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या मुलासही नमूद दोघांनी मारहान केली. अशा मजकुराच्या तानाजी पवार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : वाठवडा, ता. कळंब येथील राहुल सोपान आल्टे व सुजाता आल्टे या दोघा पती- पत्नींनी भुखंडवाटणीच्या कारणावरुन दि. 13.11.2021 रोजी 15.00 वा. सु. राहत्या गल्लीत भाऊ- संजय सोपान आल्टे यांसह त्यांची पत्नी- जयश्री व मुलगी- तेजश्री यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळई, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संजय आल्टे यांच्या प्रथम खबरेवरुन दि. 15 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : संदीप चंद्रकांत काटे, रा. किल्लारी यांसह राजेगाव येथील अभिजीत शाहुराज पाटील यांचा गावकरी- सुरज धनराज पाटील यांच्याशी शेत मोजणीच्या कारणावरुन वाद आहे. सुजर पाटील यांचे शेत शेजारी- संदीप कोटे यांनी शेत जमीन मोजणी न करता मशागत गेल्याचा जाब दि. 12.11.2021 रोजी 17.00 वा. सु. राजेगाव शिवारात सुरज पाटील यांनी विचारला असता संदीप कोटे यांसह अभिजीत पाटील यांनी सुरज यांना शिवीगाळ करुन करुन धक्काबुक्की केली व ठार मारण्याची धमकी दिली तर सुरज यांचे वडील- धनराज यांना लोखंडी सळईने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुरज पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 341, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
विनयभंगाच्या दोन घटना
उस्मानाबाद : एका पुरुषाने गावातीलच एक 30 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 15.11.2021 रोजी 19.00 वा. सु. घरी एकटी असल्याची संधी साधून चार्जर मागण्याच्या बहाण्याने तीच्या घरात घु सून तीचा विनयभंग केला. यावेळी ती महिलेने आरडा- ओरड करताच त्याने तेथून धूम ठोकली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 354 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत एका अनोळखी मोबाईल क्रमांक धारक व्यक्तीने दि. 11.11.2021 रोजी 11.00 ते 23.06 वा. दरम्यान उस्मानाबाद तालुक्यातील एका विवाहित महिलेच्या व्हॉट्सॲपवर अनेकदा अश्लील छायाचित्रे जाणीवपुर्वक पाठवून त्या महिलेचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दि. 15 नोंव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.