उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना 

 
Osmanabad police

अंबी  : केतन रामनाथ नवाळे, रा. कुक्कडगांव, ता. परंडा हे त्यांच्या आई- सुनिता नवाळे यांसह दि. 19 ऑक्टोबर रोजी 15.30 वा. सु. कुक्कडगांव शिवारातील आपल्या शेतात काम करत होते. यावेळी शेतजमीन वहीवाटीच्या कारणावरुन गावकरी- संतोष व बालाजी तुळशीराम पाटोळे या दोघा भावांनी नमूद माय- लेकरांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या केतन नवाळे यांनी दि. 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : खानापूर, ता. उस्मानाबाद येथील सुदर्शन गरड, धनराज गरड, विजय गरड, सचिन गरड हे चौघे पुर्वीच्या वादावरून दि. 19 ऑक्टोबर रोजी 19.00 वा. सु. खानापूर येथे भाऊबंद- दिनेश गरड यांना मारहान करत होते. यावेळी दिनेश यांच्या बचावास आलेले त्यांचे चुलते- विश्वनाथ गरड, चुलती- मंगल व भाऊ- शुभम यांसही नमूद चौघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी,दगड फेकुन मारुन जखमी केले. तसेच शेतातील रस्त्याने रहदारी केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मंगल गरड यांनी दि. 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : खामसवाडी, ता. कळंब येथील संजय वैद्य, नानासाहेब वैद्य, शंकर वैद्य, जालींधर शिंपले, गजानन शिंपले अशा पाच व्यक्तींनी दि. 15 ऑक्टोबर रोजी 17.00 वा. सु. संजय वैद्य यांच्या पत्रा शेडसमोर ट्रॅक्टर अडवल्याच्या कारणावरुन भाऊबंद- विठ्ठल बाबुराव वैद्य यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विठ्ठल वैद्य यांनी दि. 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                           

From around the web