उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 
Osmanabad police

ढोकी : दाउतपुर, ता. उस्मानाबाद येथील अनंत विनायक थोरात यांच्या बंद घराचे कुलूप दि. 27- 28.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 36 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 30,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अनंत थोरात यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : कळंब तालुक्यातील शिराढोन ग्रामस्थ- सुनिल मुरलीधर मुंदडा यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 5373 ही दि. 25.01.2022 रोजी 11.00 ते 22.30 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुनिल मुंदडा यांनी दि. 28 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : कुमाळवाडी, ता. उस्मानाबाद येथील कृष्णा लक्ष्मण पौळ यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीयु 2140 ही दि. 21.01.2022 रोजी 20.30 ते 21.00 वा. दरम्यान उस्मानाबाद शहरातील जरीया हॉटेलसमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या कृष्णा पौळ यांनी दि. 28 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

उमरगा  : बलसुर येथील संतोष व कुमार गोपीनाथ गायकवाड या दोघा भावांत असलेल्या कौटूंबीक वादातून दि. 28.01.2022 रोजी 11.00 वा. सु. कुमार याने भाऊ- संतोष यास शिवीगाळ करुन, लाकडी दांड्याने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संतोष गायकवाड यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web