उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 
Osmanabad police

तुळजापूर  : दत्त सोसायटी, तुळजापूर येथील श्रीमती रुपाली दगडु किसवे या दि. 21.01.2022 रोजी 06.30 वा. सु. आपल्या घरासमोरील अंगण झाडत होत्या. यावेळी एका मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी श्रीमती किसवे यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ जाउन त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे दागिने हिसकावून तेथून पसार झाले. अशा मजकुराच्या रुपाली किसवे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : तांदुळवाडी, ता. कळंब येथील अमोल भारत कदम यांची हिरो होंडा पॅशन प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 44 ई 7569 ही दि. 18.01.2022 रोजी 12.30 ते 13.30 वा. दरम्यान कळंब येथील त्यांचा मित्र प्रकाश लोढा यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अमोल कदम यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : तेर, ता. उस्मानाबाद येथील रघुनाथ नामदेव पाडुळे यांच्या गोवर्धनवाडी शिवारातील शेत विहीरीवर बसवण्यात आलेल्या गाळ काढण्याच्या यंत्राचा गियर बॉक्स दि. 09- 10.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या रघुनाथ पाडुळे यांनी दि. 21 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक

उमरगा  : उमरगा येथील ग्रामस्थ- आनंद सुंटनुरे यांना दि. 20.01.2022 रोजी 10.30 वा. सु. दोन अनोळखी फोन क्रमांकावरुन कॉल आले. यावेळी त्या कॉलवरी व्यक्तीने, “ डिएचएल कुरीयर मधुन बोलत असून तुमच्या पार्सलच्या ट्रॅकींगसाठी क्विक सपोर्ट हे मोबाईल ॲपलीकेशन डाउनलोड करा.” असे सांगीतले. यावर सुंटनुरे यांनी त्यांचे मित्र- व्यंकट किसनराव बडगे यांच्या मोबाईलवर क्विक सपोर्ट ॲपलीकेशन घेउन त्यात बडगे यांची बँक खाते विषयक गोपनिय माहिती भरली. तसेच त्या समोरील व्यक्तीने विचारल्याप्रमाणे बडगे यांचा डेबीट कार्डवरी समोरील व मागील अंक सांगीतले असता बडगे त्यांच्या बँक खात्यातून तीन व्यवहारांत एकुण 73,364 ₹ रक्कम कपात झाले. अशा मजकुराच्या व्यंकट बडगे यांनी दि. 21 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web