उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : प्रसाद कॉलनी, उस्मानाबाद येथील कमल मगर व पल्लवी टकले या दोघी दि. 03.01.2022 रोजी 16.20 वा. सु. राहत्या कॉलनीतील रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी एका मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी कमल मगर यांना पत्ता विचारण्याचा बहाना करुन मोटारसायकल थांबवली आणि श्रीमती मगर यांच्या गळ्यातील 8.5 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हिसकावून मोटारसायकलसह पसार झाले. अशा मजकुराच्या कमल मगर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : माकणी, ता. लोहारा येथील शुभम शिवाजी साठे हे दि. 02.01.2022 रोजी 12.00 ते 17.00 वा. दरम्यान कुटूंबीयांसह आपल्या शेतात गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे बंद कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 153 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या शुभम साठे यांनी दि. 03 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : नारंगवाडी, ता. उमरगा येथील प्रदिप किसन मुगळे यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 02.01.2022 रोजी 11.00 ते 04.30 वा. दरम्यान तोडून घरातील रोख रक्कम व सुवर्ण दागिने असा एकुण 45,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रदिप मुगळे यांनी दि. 03 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web