उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 
Osmanabad police

शिराढोण : लोहटा (पुर्व), ता. कळंब येथील ‘लोकमाऊली ॲग्रो ट्रेडर्स’ च्या पाठीमागील बाजुचा पत्रा दि. 06- 07.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने कापून आतील सोयाबीनची 65 पोती चोरुन नेली. अशा मजकुराच्या दुकान मालक- संदिप वालचंद कसपटे, रा. हिंगणगाव, ता. कळंब यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 लोहारा  : पेठसांगवी, ता. उमरगा येथील चंद्रकांत सिद्राम मटपती, वय 60 वर्षे हे दि. 06- 07.12.2021 रोजी दरम्यान घर कुलूपबंद करुन बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आतील 23 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 3,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या चंद्रकांत मटपती यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : जवाहर गल्ली, उस्मानाबाद येथील सतिश कमलाकर भांजी यांच्या ताब्यातील हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 0706 ही दि. 29.11.2021 रोजी 16.30 ते 17.00 वा. दरम्यान राहत्या गल्लीतून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सतिश भांजी यांनी दि. 07 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद : अवैध मद्य विरोधी कारवाईदरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 07.12.2021 रोजी 10 ठिकाणी छापे मारुन महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम अंतर्गत खालीलप्रमाणे 10 गुन्हे नोंदवले आहेत.

1) नळदुर्ग पोलीसांनी 4 ठिकाणी छापे मारले असता यात कुन्सावळी, ता. तुळजापूर येथे ग्रामस्थ- राम शिंदे, केशव शिंदे, महादेव शिंदे हे तीघे आपापल्या घरासमोर एकत्रीत देशी- विदेशी दारुच्या 8 सिलबंद बाटल्या व 38 लि. हातभट्टी दारु बाळगलेले तर सलगरा (म.) ग्रामस्थ- गुंडू ईटकर हे गावातील पशु वैद्यकीय दवाखाण्याजवळील एका टपरीसमोर देशी- विदेशी दारुच्या 6 सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले.

2) उस्मानाबाद (श.) पोलीसांनी 2 ठिकाणी छापे मारले असता यात पारधी पिढी, जुने बस आगार, उस्मानाबाद येथील ग्रामस्थ- कल्पना काळे या 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या तर तांबरी विभाग येथील दिपक पवार हे राहत्या परिसरात 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.

3) अंबी पोलीसांना जगदाळवाडी ग्रामस्थ- हुसेन शेख हे गावातील एका हॉटेलजवळील देशी दारुच्या 36 सिलबंद बाटल्या बाळगले असतांना आढळले.

4) कळंब पोलीसांना डिकसळ शिवारात ग्रामस्थ- रुपाली पवार या राहत्या परिसरातील कळंब- ढोकी रस्त्यालगत 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असतांना आढळल्या.

5) उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांच्या पथकास तेरखेडा ग्रामस्थ- निखील सांडसे हे गावातील एका हॉटेलजवळ विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या बाळगले असतांना आढळले.

6) भुम पोलीसांना शिवाजीनगर, भुम ग्रामस्थ- दत्ता खैरे हे गावातील पार्डी रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील एका शेडमध्ये देशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या बाळगले असतांना आढळले.

From around the web