उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 
Osmanabad police

उस्मानाबाद : तुळजापूर नाका, उस्मानाबाद येथील मंगेश कालीदास आवटी हे दि. 05.12.2021 रोजी रात्री 02.30 वा. सु. आपल्या घरात झोपलेले असतांना तीन अनोळखी पुरुषांनी घराच्या खिडकीतून आत प्रवेश करुन आवटी यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या कानातील सोन्याचे कुंडल व स्मार्टफोन घेउन गेले. अशा मजकुराच्या मंगेश आवटी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील फैजोद्दीन हसनोद्दीन शेख यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 13 झेड 4236 ही दि. 29.11.2021 रोजी 15.00 ते 18.00 वा. दरम्यान उस्मानाबाद येथील लघू पाटबंधारे कार्यालयासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शेख यांनी दि. 05 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : धारुर, ता. तुळजापूर येथील महेश सुरेश पवार यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 07 आर 0074 ही दि. 05.12.2021 रोजी 12.30 ते 14.00 वा. दरम्यान तुळजापूर येथील भवानी रोडवरील गणपती मंदीरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महेश पवार यांनी दि. 05 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

उस्मानाबाद  : कळंब तालुक्यातील एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 23- 24.11.2021 दरम्यानच्या रात्री तीच्या घरातून बेपत्ता झाली. यावर कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता परजिल्ह्यातील एका तरुणाने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असल्याचे समजले. अशा मजकुराच्या मुलीच्या आईने दि. 05 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web