उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 
Osmanabad police

उस्मानाबाद : सांजा रोड, उस्मानाबाद येथील ‘प्राविण्य टायर्स ॲण्ड ऑईल’ दुकानाचा पाठीमागील बाजूचा पत्रा दि. 30- 31.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञाताने उचकटून दुकानातील विविध कंपनीचे 18 टायर, चारचाकी वाहनाच्या ऑईलचे प्रत्येकी 5 लि. क्षमतेचे  8 कॅन व 7 लि. क्षमतेचे 1 बकेट असा अंदाजे 38,939 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या दुकान मालक- प्रविण चंद्रकांत सुर्यवंशी, रा. सांजा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत उस्मानाबाद येथील शासकीय तंत्रनिकेतन, महाविद्यालयासमोरील कापड स्टॉलचे पडदे दि. 30- 31.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञाताने कापून आतील सदरे 200 नग व विजारी 50 नग असे अंदाजे 49,000 ₹ किंमतीचे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या स्टॉल मालक- कैलास उकिरडे, रा. उस्मानाबाद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : मस्सा (खं.), ता. कळंब येथील ज्ञानेश्वर दशरथ तावसकर यांनी त्यांचा महिंद्रा पिकअप क्र. एम.एच. 25 पी 3806 हा ग्रामस्थ- भालचंद्र घाडगे यांच्या मोकळ्या भुखंडावर लावला असता दि. 29- 30.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञाताने तो चोरुन नेला. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर तावसकर यांनी दि. 31.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web