धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 
 

 
crime

धाराशिव  : फिर्यादी नामे- बिभीषण हरिबा गलांडे, वय 64 वर्षे, रा. सुर्डी, ता. जि. उस्मानाबाद हे कामानिम्मीत बाहेर गावी गेलेले असताना त्यांचे राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 18.08.2023 रोजी 08.00 ते 31.08.2023 रोजी 08.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील संसार उपयोगी सामान अंदाजे 23,150 ₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी बिभीषण गलांडे यांनी दि.07.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-454, 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 तुळजापूर  : फिर्यादी नामे- धन्यकुमार काशीनाथ पाटील, वय 48 वर्षे, शुक्रवार पेठ, नेपते गल्ली, तुळजापूर जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 एपी 6680काळ्या रंगाची ही दि.06.09.2023 रोजी 22.00 ते दि. 07.09.2023 रोजी 06.30 वा. सु. धन्यकुमार पाटील यांचे राहत्या घरा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी धन्यकुमार काशीनाथ पाटील यांनी दि.07.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी   : फिर्यादी नामे- राम गुलाब बागल, वय 53 वर्षे, रा. कदमवाडी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची काळ्या रंगाची गावरान जातीची म्हैस ही दि. 03.09.2023 रोजी 23.00 ते दि.04.09.2023 रोजी 02.00 वा. सु. राम बागल यांचे राहत्या घरासमोर बांधलेली ही अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी राम बागल यांनी दि.07.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web