धाराशिव जिल्ह्यात तीन मद्यपी चालकावर गुन्हा दाखल 

 
crime

भूम : चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव येथील- सागर नागनाथ स्वामी, वय 35 वर्षे, हे दि.19.09.2023 रोजी 18.00  वा. सु. आपल्या ताब्यातील  वाहन  हे गोलाई चौक भुम येथे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : गणेशनगर, मुरुम, ता. उमरगा जि. धाराशिव येथील- अर्जुन पांडुर्रग राठोड, वय 32 वर्षे, हे दि.19.09.2023 रोजी 19.55  वा. सु. आपल्या ताब्यातील होंडा ब्रिओ गाडी क्र एमएच 12 केई 4966 ही रामकृष्ण हॉटेल समोर उमरगा येथे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : खर्डा, ता. कळंब जि. धाराशिव येथील- सोमनाथ मुरलीधर लोकरे, वय 45 वर्षे, हे दि.20.09.2023 रोजी 18.00  वा. सु. आपल्या ताब्यातील विना नंबर मोटरसायकल  ही येरमाळा घाटामध्ये रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web