उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन गुन्ह्यांतील तीन आरोपींस कारावासाची शिक्षा

 
court

 उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन गुन्ह्यांतील तीन आरोपींस कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

1) नळदुर्ग पोलीस ठाणे गु.र.क्र. 170 / 2017 (सत्र खटला क्र. 15 / 2018) भा.दं.सं. कलम- 304 या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक- श्री. सुर्यवंशी यांनी करुन उस्मानाबाद सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल आज दि. 29.10.2021 रोजी जाहिर होउन आरोपी- प्रकाश कृष्णा घोडके, वय 35 वर्षे, रा. सलगरा (म.), ता. तुळजापूर यांस भा.दं.सं. कलम- 304 चे उल्लंघन केल्याबद्दल 6 वर्षे सश्रम कारावासाची व 500 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

             2) वाशी पो.ठा. गु.र.क्र. 131 / 2017 (सत्र खटला क्र. 42 / 2019) या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोहेकॉ- श्री. आर.एम. भालेराव यांनी करुन भूम सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल काल दि. 28.10.2021 रोजी भूम सत्र न्यायालयात जाहिर झाला. यात आरोपी- दिपक श्रीमंत देशमुख, वय 35 वर्षे, रा. ईट, ता. वाशी यांनी सार्वजनिक मालमत्तेचे जाणीवपुर्वक नुकसान करुन भा.दं.सं. कलम- 427 चे उल्लंघन केल्याबद्दल 3 महिने साधा कारावासासह 1,000 ₹ दंडाची तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम- 3 च्या उल्लंघनाबद्दल 3 महिने साधा कारावासासह 2,000 ₹ दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

            3) तुळजापूर पो.ठा. गु.र.क्र. 128 / 2014 (खटला क्र. एससीसी 309 / 2014) या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोहेकॉ- श्री. एम.बी. जाधवर यांनी करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर येथे आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल काल दि. 28.10.2021 रोजी जाहिर होउन आरोपी- राहुल बाळू सावंत, रा. बसवंतवाडी, ता. तुळजापूर यांनी निष्काळजीपने वाहन चालवून मानवी जखमा व मृत्युस कारणीभुत ठरून भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) चे उल्लंघन केल्याबद्दल 2 महिने साधा कारावासासह 6,500 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

From around the web