धाराशिव शहरात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

धाराशिव  : फिर्यादी नामे-शरद भुजंगराव जाधवर, वय 44 वर्षे, रा.लक्ष्मी कॉलनी, समर्थ नगर, उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांचे राहते घराचा लोखंडी गेटचे कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.05.08.2023 रोजी 19.00 ते दि.07.08.2023 रोजी 10.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील हिक्वीजन कंपनीचा डिव्हिआर अंदाजे 9,000₹ किंमतीचा चोरुन नेला. अशा मजकुराच्या शरद जाधवर यांनी दि.08.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 454, 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 धाराशिव  : फिर्यादी नामे- राहुल बबनराव भांडवले, वय 32 वर्षे, रा. गणेशनगर, ता. जि. उस्मानाबाद यांचा चरण्यास बांधलेला रेडा हा आरोपी नामे कुलदिप ज्ञानदेव गायकवाड, रा. बालाजीनगर उस्मानाबाद यांनी दि.08.08.2023 रोजी 15.30 वा. सु. आय टी आय कॉलेज उस्मानाबाद येथुन मोटरसायकल क्र एम एच 25 एस 4625 या गाडीला बांधून घेवून जात असताना मिळून आला. अशा मजकुराच्या राहुल भांडवले यांनी दि.08.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379, 511 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात उस्मानाबाद शहर पो ठाणे च्या पथकाने  आरोपी नामे कुलदिप ज्ञानदेव गायकवाड, रा. बालाजीनगर उस्मानाबाद यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली. व त्याचे कब्जातुन चोरीस गेलेला वरील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  

धाराशिव  : फिर्यादी नामे पार्वती उर्फ शकुंतला गंगाधर शिंगाडे , वय 82 वर्षे रा. भिमनगरी ता. जि. उस्मानाबाद यांच्या बटव्यातील रोख रक्कम अंदाजे 9,900 ₹ ही दि.08.08.2023 रोजी 12.30 वा. सु. बसस्टॅड जवळील एसबीआय बॅक उस्मानाबाद येथे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या पार्वती शिंगाडे यांनी दि.08.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : फिर्यादी नामे दिलीप निवृत्ती सरडे , वय 45 वर्षे रा. पळसप ता. जि. उस्मानाबाद यांचा अंदाजे 10,00 ₹ किंमतीचा सॅमसंग कंपनीचा ए 2 266/128 ग्रे रंगाचा मोबाईल फोन  दि.21.11.2022 रोजी 23.00 ते 28.11.2022 रोजी 06.00 वा. सु. दिलीप सरडे यांचे घराचे अंगनातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या दिलीप सरडे यांनी दि.08.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web