धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

शिराढोण  : फिर्यादी नामे- नानासाहेब ज्ञानदेव नाईकनवरे, वय 62 वर्षे, रा. ढोराळा, ता. कळंब जि. उस्मानाबाद यांचे मौजे ढोराळा शिवारातील शेत गट नं 305 मध्ये असलेले दाळमिलचे शेजारी असलेल्या रुमचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.08.08.2023 रोजी 21.00 ते दि.09.08.2023 रोजी 08.00 वा. सु. तोडून व दाळ मिलच्या परिसरातील 1.3 एचपी 960 आर. पी. एम. च्या 3 ईलेक्ट्रीक मोटार किंमत अंदाजे 20,000₹, 2.2एचपी च्या 960 आर पी एम च्या तीन इलेक्ट्रीक मोटार किंमत अंदाजे 12,000₹, साडेतीन किलो वजनाचा ईलेक्ट्रीक काटा अंदाजे 8,000₹,वेल्डींग मशीन, ड्रिल मशीन, ग्राईंडींग मशीन, प्लेटा, चॅनेल ॲगल, भंगार,पाण्याची लहान मोटर असा एकुण 69,000₹माल हा चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नानासाहेब नाईकनवरे यांनी दि.03.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 380, 457 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : फिर्यादी नामे- नसीर अ. जहुरोद्दीन शहाबर्फीवाले, वय 50वर्षे, रा. मंगळवार पेठ, परंडा ता. परंडा जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची काळ्या रंगाची हिरो कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25  वाय 7877 ही दि.01.09.2023 रोजी 20.30 वा. सु. भोत्रा रोड, भिमनगर येथील सिध्दार्थ मारुती बनसोडे यांचे घरासमोरुन परंडा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नसीर शहाबर्फीवाले यांनी दि.03.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 येरमाळा  : फिर्यादी नामे- अजय संजय रणदिवे, वय 24 वर्षे, वडगाव ज. ता. कळंब जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची होंडा शाईन मोटरसायकल क्र एमएच 13 बीए 8283 ही दि.01.09.2023 रोजी 01.00 ते 06.00 वा. सु. ज. एमएच 52 रोडलगत असलेल्या शिवनेरी हार्डवेअर समोरुन वडगाव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी अजय रणदिवे यांनी दि.03.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

From around the web