धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

 उमरगा :आरोपी नामे- 1)अतुल तानाजी चव्हाण, 2) सचिन राजेंद्श्र जाधव, 3) अनिकेत किसन चव्हाण, 4) राहुल शेषेराव राठोड तिघे रा. कदेर तांडा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि.23.08.2023 रोजी 09.00 वा. सु. औराद पाटी आळंद रोडवर फिर्यादी नामे श्रेयश सुभाष चौगुले, वय 22 वर्षे रा. छत्रपती शिवाजी चौक गुंजोटी ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे पेशंट घेवून तडोळा ते आळंद जात असताना यातील नमुद आरोपीनी फिर्यादीचे कारला मोटरसायकल आडवी लावून कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम अंदाजे 5,000 ₹ जबरीने काडून घेतली. अशा मजकुराच्या  श्रेयश चौगुले यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 395 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  :आरोपी नामे- 1)सुषमा बापु चव्हाण, 2) बापु भगवान चव्हाण दोघे रा. साई नगर विर भद्रेश्‍वर मंदीराजवळ सोलापूर यांनी दि.23.08.2023 रोजी नळदुर्ग सितारा हॉटेल येथे  फिर्यादी नामे लता नंदकुमार पाटील, वय 29 वर्षे, रा. मरमच्ची ता. जि. गुलबर्गा यांचे ट्रॅव्हल्स क्र एआर 06 बी 4940 मध्ये खालच्या शिटवर बसून प्रवास करत असताना फिर्यादीचे बॅगमधील छोट्या पर्समधील  पाच ग्रॅम सोन्याचे दागिणे, व रोख रक्कम 2000₹ असा एकुण 27,000₹ किंमतीचा माल चोरी केला. अशा मजकुराच्या  लता पाटील यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 तुळजापुर  :फिर्यादी नामे पंकज शंकरराव शहाणे, वय 42 वर्षे, रा. लोहिया मंगल कार्यालय जवळ तुळजापूर जि.उस्मानाबाद यांचे सिंदफळ शिवारातील गट नं 292/4,5,6,7 मधील प्लॉटींग मध्ये केलेले 40 लाईटचे पोलचे नुकसान करुन खाली पाडून अंदाजे दहा ते बार रनिंग फुट ॲल्युमिनीअम तार अंदाजे चार हजार किलो किंमत अंदाजे 5,60,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्याक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या पंकज शहाणे यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक 
 
नळदुर्ग  : फिर्यादी नामे-1) राहुल किसन ढवळे, 32 वर्ष्ज्ञे रा. वत्सलानगर अणदुर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना दि.08.08.2023 रोजी 12.00 ते 14.00 वा. सु. वत्सलानगर येथे मोबाईल क्र 7029036195,9337991370च्या धारकाने फिर्यादीचे मोबाईलवर फोन करुन आम्ही क्रेडीट कार्ड कस्टमर केअर वरुन बोलत आहे. असे सागूंन फिर्यादीचे मोबाईलवर ओटीपी पाठवून तो फिर्यादी यांचे कडून घेवून तृयाच दिवशी फिर्यादी यांचे खाते क्रंमाकावरुन व क्रेडीट कार्ड  वरुन 54,000 ₹ परस्पर काढुन घेवून फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी राहुल ढवळे यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420,सह 66 (सी) (डी) आय टी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web