धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल  

 
crime

उमरगा   :फिर्यादी नामे- राजकुमार सुभाष नंदर्गे, वय 36 वर्षे, रा. रामनगर उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 10,000₹ किंमतीची हिरो फॅशन प्रो मोटरसायकल क्र एमएच 25 एस 8324 ही दि.31.07.2023 रोजी 23.00 ते दि.01.08.2023 रोजी 06.00 वा. सु. एजन्सी जकेकुर चौरस्ता येथे राजकुमार नंदर्गे यांचे दुकानासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राजकुमार नंदर्गे यांनी दि.17.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : फिर्यादी नामे- राजाभाउ रामभाउ लगदिवे, वय 65 वर्षे, रा. शेकापूर ता. जि. उस्मानाबाद यांचे शेकापूर शिवारातील गट नं 11 मधील अंदाजे 80,000₹ किंमतीची बाभळीचे झाडे आरोपी नामे- विजयकुमार भिमसेन लगदिवे, रा. शेकापूर ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.28.06.2023 रोजी 10.00 वा. सु. उस्मानाबाद कोर्टाचा कब्जा मनाई आदेशाचा अवमान करुन नमुद बाभळीचे झाडे चोरुन नेली. अशा मजकुराच्या राजाभाउ लगदिवे यांनी दि.17.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379, 188 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : फिर्यादी नामे- रामचंद्र पांडूरंग यमगर, वय 60 वर्षे, रा. एसटी कॉलनी नळदुर्ग रोड तुळजापूर. जि. उस्मानाबाद यांचे यमगरवाडी शिवारातील गट नं 90 मधील अंदाजे 10,000₹ किंमतीची बोरचे कॉम्प्रेशर व ईलेक्ट्रीक मोटर लक्ष्मी कंपनीची न 2007 ही दि.13.08.2023 रोजी 18.00 ते दि.16.08.2023 रोजी 14.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या रामचंद्र यमगर यांनी दि.17.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी  पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web