धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

लोहारा  : मार्डी, शिवारातील पवनचक्कीचेलोकेशन क्रमांक जी.टी. 603 सदर मधील वायर 220 मिटर अंदाजे 30,140 ₹ तांब्याचे आर्थीक केबल तसेच लोहारा शिवारातील लोकेशन क्रमांक जी.के. ओ. 150 सदर मशीन मधील 220 मिटर वायरतांब्याचे अर्थीक केबल अंदाजे 30,140₹ किंमतीचे असा एकुण 60,280 ₹ किंमतीचा माल हा दि.25.07.2023 रोजी 02.00 वा. सु. मार्डी शिवारातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या अमोल रामचंद्र कुंभार, वय 38 वर्षे, धंदा सबस्टेशन मॅनेजर, रा. लोहारा, ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांनी दि.06.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 धाराशिव  : फिर्यादी नामे- अलोक अरुण कटके, वय 31 वर्षे रा. साळुंके नगर उस्मानाबाद जि. उस्मानाबाद यांचे पत्नी या बार्शी  येथे जाण्यासाठी उस्मानाबाद बसस्थानक येथे गेल्या असता दि.06.08.2023 रोजी 10.30 ते दि.06.08.2023 रोजी 10.45 वा. सु  अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवुन फिर्यादीचे पत्नीच्या पर्स मधील रोख रक्कम 8200 ₹ व 3.50 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे असा अंदाजे 17,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या अलोक कटके यांनी दि.06.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : फिर्यादी नामे- तात्याराव लक्ष्मण कांबळे, वय 73 वर्षे, रा. सावळसुर, ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे दि.06.08.2023 रोजी 06.00 वा. सु. बसस्थानक उमरगा येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून नागेश सुभाष चौगुले, रा. उमरगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी तातृयाराव कांबळे यांचे पॅन्टच्या मागील खिशातील 6,500 ₹ काढून घेताना मिळून आला. अशा मजकुराच्या तात्याराव कांबळे यांनी दि.06.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात उमरगा पो ठाणे च्या पथकाने उमरगा बसस्थानक येथे संशईत आरोपी नामे नागेश सुभाष चौगुले, रा. उमरगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी ताब्यात घेवून त्याचकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली. व त्याचे कब्जातुन चोरीस गेलेला वरील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

From around the web