धाराशिव जिल्ह्यात रविवारी चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

परंडा  : फिर्यादी नामे- गणेश चंद्रकांत कवटे, वय 23 वर्षे, रा. रुई ता. परंडा जि. उस्मानाबाद यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने घेवून त्यातील 8 ग्रॅम सुवर्ण दागिणे व चांदीचे 200 ग्रॅमचे दागीणे असा एकुण 62,000₹ किंमतीचा माल हा दि. 04.08.2023 रोजी 18.50 वा. सु. एस टी स्टॅड येथील कटींगच्या दुकानासमोरुन  येडशी ,ता. जि. उस्मानाबाद येथील प्रदिप बंकट शिंदे व अन्य 1 यांनी लुटून पसार झाले होते. अशा मजकुराच्या गणेश कवटे यांनी दि.05.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 392, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात परंडा पो ठाणे च्या पथकाने आरोपी नामे- प्रदिप बंकट शिंदे, वय 25 वर्षे, रा. येडशी, ता. जि. उस्मानाबाद यास गोपणीय माहितीच्या आधारे ताब्यात घेवून त्याचकडे चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली. व त्याचे कब्जातुन चोरीस गेलेला वरील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.अन्य एका साथीदारचा पोलीस शोध घेत आहेत.

 नळदुर्ग : फिर्यादी नामे- कल्लय्या महादेव स्वामी, वय 45 वर्षे रा. इटकळ ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांच्या ट्रक क्श्र एमएच 11 एएल 1937 मधील अंदाजे 17,228₹ किंमतीचे 195 लिटर डिझेल  हे दि. 31.07.2023 रोजी 11.00 ते दि.01.08.2023 रोजी 11.00 वा. सु. शाही धाबा इटकळ येथे उभे असलेल्या ट्रक मधून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या कल्लय्या स्वामी ड्रायव्हर यांनी दि.05.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : फिर्यादी नामे- विक्रम माणिकराव पवार, वय 61 वर्षे रा. हडको, तुळजापूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची टीव्हीएस मोटरसायकल ही दि.29.07.2023 रोजी 22.00 वा. सु. ते दि.30.07.2023 रोजी 09.00 वा. सु. लाटे बिल्डींग शेजारी शिवाजी नगर तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विक्रम पवार यांनी दि.05.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web