उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

भूम  - भुम पोलीस ठाणे : पिंपळगाव, ता. भुम येथील- आलम निजाम सय्यद यांच्या  दि.02.02.2023 रोजी 15.00 ते 18.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने घराच्या दरवाजाचे कूलुप तोडून आतमधील कपाटात ठेवलेली रोख रक्कम अंदाजे 50,000 ₹ चोरून नेली. अशा मजकुराच्या आलम सय्यद यांनी दि.03.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : ढोराळा, ता. कळंब येथील- सरोजिनी दत्तोबा जायभाय यांचे दि 14.01.2023 रोजी 12.00 ते दि.03.02.2023 रोजी 10.30 वा. सु. सर्वे नं. 99 मध्ये एमएच.25 फुड मॉलच्या पाठीमागे सरोजिनी यांच्या पत्र्याचे शेडचे पांढरे बाई व अज्ञात दोन इसमांनी कुलूप तोडून अंदाजे 2000 ₹ किंमतीचे एक लोखंडी पलंग, उ्टोव्ह व इतर संसार उपोयगी साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या सरोजिनी जायभाय यांनी दि.03.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा  : काव्हे, ता. माढा  येथील- दादा रुकुमद्दीन सय्यद यांची अंदाजे 15,000 ₹ किंमतीची हिरो होन्डां स्पे्लन्डंर मोटारसायकल क्र.एम.एच.45एल.4217 ही दि.24.01.2023 रोजी 20.00 ते दि.26.01.2023 रोजी 07.30 वा. दरम्यान मोमीन गल्ली परंडा येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दादा सय्यद यांनी दि. 03.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web