उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

 उस्मानाबाद : वडगाव (सि), ता. उस्मानाबाद येथील- भारत गणपत माळी यांच्या वडगाव (सि) शिवारातील गट क्र.255 मधील शेतातील अंदाजे 12,000 ₹ किंमतीचा विद्युत पंप  हा दि.01.02.2023 रोजी 22.30 ते दि 02.02.2023 रोजी 08.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. अशा मजकुराच्या भारत माळी यांनी दि.02.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
वाशी  : विजोरा, ता. भुम येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरीवरील दोन विद्युत पंपांच्या सुमारे 400 मीटर विद्युत वायर दि.31.01.2023 ते 01.02.2023 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरून नेले आहे. अशा मजकुराच्या सरमकुंडी ग्रामपचांयत कर्मचारी- नामदेव हाके यांनी दि. 02.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : सातेफळ, ता. कळंब  येथील- दत्तात्रय अंगद वाघमारे यांचे कंटेनर मधील दि.02.02.2023 रोजी 01.00 ते 06.00 वा. दरम्यान सातेफळ येथील हनुमान मंदीराजवळ उभे केलेल्या ठिकाणावून अज्ञात व्यक्तीने कंटेनरच्या डिझेलच्या टाकीचे लॉक तोडून अंदाजे 25,000 ₹ किंमतीचे 200 लिटर डिझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या दत्तात्रय वाघमारे यांनी दि. 02.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web