उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद : एस.टी. कॉलनी, उस्मानाबाद येथील- श्रीकृष्ण्‍ तुकाराम कावळे  यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 22.02.2023 रोजी 11.00ते 15.00 वा. दरम्यान तोडून घरात प्रवेश करुन आतील कपाटातील 55 ग्रॅम वजनाचे सुवर्ण -चांदीचे दागिने असा एकुण 1,51,300 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या श्रीकृष्ण्‍ कावळे  यांनी दि. 22.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : बायपास रोड साईकमल हॉटेल शेजारी, उस्मानाबाद येथील- नागेश बिभीषण मुळूक, शक्करजी कुरेशी या दोघांचे  दि.20.02.2023 रोजी 20.30 ते दि. 21.02.2023 रोजी 07.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने महिंद्रा बोलेरो मॅक्सचे चार टायर, दोन शेळ्या असा एकुण 54,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या नागेश मुळूक यांनी दि. 22.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : वैष्ण्वी देवी दुधडेअरी ईटकळ, ता. तुळजापूर येथील ट्रॅन्सफॉर्मर डी. पी. तील अंदाजे 55,000 ₹ किंमतीचे 250 लिटर आईल हे दि.18.02.2023 रोजी 01.30 वा. सु.अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या वॉचमन -गणेश लक्ष्मण देवकर रा. बाभळगाव, ता. तुळजापूर यांनी दि. 22.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web