उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल
नळदुर्ग : नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील- सुलोचना देविदास राठोड यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 21.02.2023 रोजी 14.00ते 16.00 वा. दरम्यान तोडून घरात प्रवेश करुन आतील कपाटातील सुवर्ण दागिने व 2,00,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 3,30,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुलोचना राठोड यांनी दि. 21.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : कावलदरा, ता. उस्मानाबाद येथील- सावित्रीबाई राजु राठोड यांचा व बावी येथील- वैभव तांबे यांचे बंद घराच्या दरवाजाचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 21.02.2023 रोजी 10.00ते 15.00 वा. दरम्यान तोडून घरात प्रवेश करुन आतील कपाटातील सुवर्ण दागिने व 35,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 7,17,500 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सावित्रीबाई राठोड यांनी दि. 21.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : जवाहर गल्ली, तुळजापूर येथील- भिमा चंद्रकांत जवंजाळ यांची अंदाजे 40,000 ₹ किंमतीची हिरो स्पेलंन्डर मोटारसायकल क्र.एम.एच.25 एएन 3158 ही दि.16.02.2023 रोजी 21.00 ते 22.30 वा. दरम्यान हाडको तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या भिमा जवंजाळ यांनी दि. 21.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.