धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

ढोकी : पारधी पिडी, तेर येथील- नवनाथ मच्छिंद्र पवार, वय 26 वर्षे, यांचे अंदाजे 1,30,000₹ किंमतीचे अशोक लेलॅन दोस्त वाहन क्र एमएच 49 डी. 1160 हे दि.27.06.2023 रोजी 01.00 वा. सु. वानेवाडी जाणारे रोडवर वस्तु संग्राहालयाजवळ तेर येथे नुद वाहनात बसलेलो असताना अनोळखी 4 व्यक्तीनी नवनाथ यांना वाहनामधुन खाली ओढुन लाथाबुक्यांनी मारहान केली. जिवे ठार मारण्याची धमकी देवून नवनाथ यांचे वाहन जबरीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या नवनाथ पवार यांनी दि.10.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं. वि. सं. कलम- 394 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 धाराशिव  : ख्वाजानगर, उस्मानाबाद येथील- सोहेल मजहर शेख, वय 25वर्षे, यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची मोटरसायकल एच एफ डिलक्स क्र एमएच 25 ए.बी. 3354 ही दि.06.07.2023 रोजी 23.00 ते 07.07.2023  रोजी 03.00 वा. सु. नगर परिषद कॉम्पलेक्सच्या शेजारी उभी केली होती. नमुद मोटरसायकल ही अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सोहेल शेख यांनी दि.10.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : स्वामी 1-6-766 शांतीनगर, रायदुर्गम राज्य आंध्रप्रदेश येथील- रुपाली येररीस्वामी राउत, वय 34 वर्षे, या दि.30.05.2023 रोजी 19.00 ते 31.05.2023 रोजी 08.00 वा. सु. बेल्लारी ते तुळजापूर  बस मधून प्रवास करत होत्या. दरम्यान त्यांच्या बॅगमधील अंदाजे 37.5 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे व  रोख रक्कम 6000₹ असा एकुण 1,60,000₹ किंमतीचा माल गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या रुपाली राउत यांनी दि.10.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो.ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.                              

From around the web