धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

तुळजापूर  : वेश्वी, आलिबाग येथील- राजेश्री रविंद्र हांडे देशमुख, वय 55 वर्षे यांचे दि.25.06.2023 रोजी 14.45 वा. सु श्री. तुळजाभवानी मंदीरातील चिंतामणी दगडाजवळ असताना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तीने राजेश्री यांचे पर्स मधील रोख रक्कम अंदाजे 29,000 ₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या राजश्री हांडे देशमुख यांनी दि.25.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब :मलकापूर, ता. कळंब येथील-बशीरा पाशाभाई सय्यद, वय 40वर्षे यांचे दि.24.06.2023 रोजी 15.00 वा. सु मलकापूर येथे जाण्यासाठी बसस्थानक कळंब येथे थांबल्या असता बशीरा यांचे पर्स मधील रोख रक्कम 2000 ₹ 21 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे असा एकुण 56,600 ₹ किंमतीचा माल हा गर्दीचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या बशीरा सय्यद यांनी दि.25.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी  :बालाजी नगर, ढोकी, येथील- टॉवरला बसविण्यात आलेले बॉक्स मधील एअरटेल कंपनीचे कार्ड एबीआय 0 1 -एबीआयए-2 इलेक्ट्रीक्स कार्ड अंदाजे 1,99,000 ₹ किंमतीचे हे दि.11.06.2023 रोजी 02.00 वा. सु अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या संतोष बिभीषण मारवडकर रा. मुळेवाडी, ता. उस्मानाबाद यांनी दि.25.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web