धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

धाराशिव  : अंबेजवळगे, ता. उस्मानाबाद येथील- रविंद्र अंकुश शिंदे, वय 42 वर्षे, यांचे घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.10.06.2023 रोजी 12.30 ते 18.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कापाटातील सुवर्ण दागिणे व रोख रक्कम 1,500 ₹ असा एकुण 95,000 ₹ किंमतचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या रविंद्र शिंदे यांनी दि.11.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  :  होळी तांडा, ता. लोहारा येथील- गोविंद श्रीमंत चव्हाण,35 वर्षे, यांचे घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.10.06.2023 रोजी  21.00 ते दि 11.06.2023 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कापाटातील सुवर्ण दागिणे व रोख रक्कम 45,000 ₹ असा एकुण 2,48,000 ₹ किंमतचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या गोविंद चव्हाण यांनी दि.11.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : विजय नगर, गुलबर्गा येथील- क्षिरालिंग बनलिंगप्पा रुगी, वय 57 वर्षे, यांची अंदाजे 1,50,000 ₹ किंमतीची टाटा सुमो  क्र के.ए. 32 एम 4004 ही दि. 11.06.2023 रोजी 11.30 ते 14.30  वा. सु. जगदाळे पार्कींग तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या क्षिरालिंग बनलिंगप्पा रुगी यांनी दि. 11.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web