धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

तामलवाडी  : पांगरधरवाडी, ता. तुळजापूर येथील- समाधान रामहारी जाधव धोडींबा बलभिम कदम दोघांचे घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.07.06.2023 रोजी 01.00 ते 07.06.2023 रोजी 03.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील व लोखंडी पेटीत ठेवलेले 110 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे, 7 तोळे चांदीचे दागिणे, एक मोबाईल फोन व रोख रक्कम 6000 ₹ असा एकुण3,82,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या समाधान जाधव यांनी दि.07.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : हिवर्डा, ता. भुम येथील- किसनबाई भिमराव मुंडे वय 62 वर्षे, यांची सुन व मुलगा  हे दि. 05.06.2023 रोजी  22.15 वा. सु. घरासमोरील अंगणात झोपले असता गावकरी- अजिनाथ मुंढे, सपंत मुंढे, विठ्ठल गोपाळघरे, पुजा मुंढे यांनी किसनाबाई व त्यांचा  मुलगा दत्ता व सुन यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान केली. किसनाबाई यांचे गळ्यातील 40 सोन्याचे मणी व दत्ता यांचे इज्यारीच्या खिशातील 1,800 ₹ चोरुन नेले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या किसनाबाई मुंढे यांनी दि. 07.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 379, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम  : हिवर्डा, ता. भुम येथील- पुजा तानाजी मुंढे यांचे दि. 05.06.2023 रोजी 01.30 ते 01.45 वा. सु. घरासमोरील पत्रा शेड मध्ये बांधलेले 7 शेळ्या, व एक बोकड, असा एकुण 45,000₹ किंमतीचा माल हा  गावकरी- अनिल मुंढे, दादासाहेब मुंढे, धनाजी मुंढे, भाउसाहेब मुंढे यांनी चोरुन नेले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पुजा मुंढे यांनी दि. 07.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 379, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web