धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल
शिराढोण : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखा शिराढोण येथील कॅशिअर खोलीचे लाकडी अज्ञात व्यक्तीने दि. 13.05.2023 रोजी 17.30 ते 15.05.2023 रोजी 14.30 वा दरम्यान खिडकी तोडून आत प्रवेश करुन तिजोरी तोडून तिजोरीतील रोख 2,55,736 ₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या विदयाभवन शाळेजवळ, कळंब येथील- विजय आत्माराम पवार, वय 57 वर्ष, धंदा- नोकरी यांनी दि. 15.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : लोहारा ता.परंडा येथील- मनोज नागनाथ शिंगनाथ यांचे दि.14.05.2023 रोजी 17.00 ते 22.30 वा. सु. लोहारा येथे दरवाजा नसलेले घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन रोख रक्कम 1,20,000 रु चोरुन नेले. अशा मजकुराच्या मनोज शिंगनाथ यांनी दि. 15.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : माळकरंजा पाटी, ता. कळंब येथील - रेखा विलास लोंढे यांच्या घरातील सुवर्ण दागिाणे अंदाजे- 59,000 ₹ किंमतीचा माल सनी दिपक गायकवाड, रा. कळंब यांनी चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या समीर रेाखा लोंढे यांनी दि. 15.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल
कळंब : इंदीरा नगर, कळंब ग्रामस्थ- राहुल बापु आळणे दि.15.05.2023 रोजी कार्तीकी भेळ सेंटरच्या हागाड्यावर कळंब येथे रस्त्यालगत आपल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.